esakal | संघ नेते पी. परमेश्‍वरन यांचे निधन; मोदी, शहा यांच्यासह अनेकांची श्रद्धांजली
sakal

बोलून बातमी शोधा

Veteran RSS pracharak P Parameswaran passes away

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केरळचे राज्यपाल अरीफ मोहंमद खान, केरळचे मुख्यमंत्री पीनरई विजयन यांनी पी. परमेश्‍वरन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

संघ नेते पी. परमेश्‍वरन यांचे निधन; मोदी, शहा यांच्यासह अनेकांची श्रद्धांजली

sakal_logo
By
वृत्तसेवा

कोची : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, भारतीय विचार केंद्राचे संस्थापक व कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी. परमेश्वरन (वय 91) यांचे आज निधन झाले. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील ओट्टापळम येथे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. सोमवारी सायंकाळी मुहम्मा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पी. परमेश्‍वरन हे एक प्रख्यात लेखक, कवी, संशोधक आणि द्रष्टे होते व राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या कार्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव (1967 - 1971) आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष (1971 - 1977), दीनदयाळ संशोधन संस्था, नवी दिल्लीचे माजी संचालक (1977 - 1982), अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्यासोबत त्यांनी काम केले.

'बाहुबली'ची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात; लवकरच लग्न?

केरळमधील अलप्पुळा जिल्ह्यातील मुहम्मा येथे 1927 मध्ये त्यांचा जन्म झाला. परमेश्‍वरन यांनी विद्यार्थिदशेतच संघात प्रवेश केला. त्यांनी केरळ विद्यापीठातून बी.ए. इतिहास (ऑनर्स) विशेष नैपुण्यासह पूर्ण केले, त्यानंतर ते पूर्णवेळ संघ प्रचारक झाले. आणीबाणीच्या काळात त्यांना "मिसा'अंतर्गत 16 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. देशाच्या पुनरुत्थानासाठी स्वदेशी भावनेने राष्ट्रीय चेतना भरण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर जनजागृतीचे वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी 1982मध्ये तिरुअनंतपुरम येथे भारतीय विचार केंद्राची स्थापना केली.

बारामतीत पहिला रणजी सामना रंगणार 'या' तारखेला

स्वामी विवेकानंद आणि कार्ल मार्क्‍स यांच्या जीवन आणि कार्यावरील "मार्क्‍स आणि विवेकानंद' या शीर्षकाखाली त्यांनी ग्रंथरचना केली. त्यांच्या "श्री नारायण गुरू - दी प्रॉफेट ऑफ रेनिसान्स', "फ्रॉम मार्क्‍स टू महर्षी', "ऑरबिंदो - दी प्रॉफेट ऑफ फ्यूचर', "दी चेंजिंग सोसायटी अँड दी चेंजलेस वॅल्यूज' आदी पुस्तकांतून त्यांनी राष्ट्रीय चेतनेचे काम केले. केरळ मॉडेल या संकल्पनेतील फोलपणा उघडकीस आणण्यात ते काळाच्या पुढे होते आणि त्यांचेच मत नंतर प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी मांडले. स्वामी विवेकानंद यांचे जीवन व कार्यावरील त्यांच्या सखोल विद्वत्तेची नोंद घेऊन त्यांना 1993 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या शिकागोतील भाषणाच्या शताब्दी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे ते अध्यक्षही होते.
हनुमान प्रसाद पोद्दार पुरस्कार, कोलकाता (1997), माता अमृतानंदमयी मठातर्फे दिला जाणारा अमृता कीर्ती पुरस्कार (2002) आणि हिंदू रेनिसान्स अवॉर्ड (2010) हे परमेश्वरजींना मिळालेले काही प्रमुख पुरस्कार होत. केंद्र सरकारनेही त्यांच्या कार्याची दखल घेत 2004 मध्ये पद्मश्री आणि 2018 मध्ये दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण देऊन सन्मानित केले.