पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे दोन दिवसांच्या जिवंत अर्भकाला पुरण्याचा प्रयत्न

दत्ता भोंगळे
Wednesday, 28 October 2020

आंबोडी (ता. पुरंदर) येथे एका नवजात अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना नुकतीच पुढे आली.

गराडे ः आंबोडी (ता. पुरंदर) येथे एका नवजात अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना नुकतीच पुढे आली. सुदैवाने जवळच शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिला त्यांनी लांबूनच आवाज दिल्यावर दोन तरुण खड्डा करण्याचे काम अर्धवट टाकून त्यांनी पळ काढला. मात्र जाताना अर्भकास तेथेच सोडून गेले. या अर्भकाला जेजुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यासंदर्भात सासवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आंबोडी येथील शेतात दोन तरुण खड्डा खणत होते. परिसरातील काही लोकांनी काहीतरी वेगळे घडते असा संशय आल्याने त्यांनी लांबून काय करताय असे विचारले असता, मात्र या तरुणांनी तातडीने दुचाकी घेऊन पळ काढला.

जाताना मात्र या अर्भकाला तेथे सोडून दिले. यानंतर या नागरिकांनी सासवड पोलिस ठाण्यात ही बातमी दिली. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी घटनास्थळी भेट दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी साधारण दोन दिवसाचे जिवंत अर्भक असल्याचे दिसून आले. त्यांनी या अर्भकाला ताब्यात घेऊन जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. येथील तपासणी नंतर त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती डी. एस. हाके यांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to bury a two-day-old baby alive at Ambodi in Purandar taluka