बनावट अधिकारपत्राद्वारे वाघोलीतील १० एकर जागा बळकावण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
बनावट अधिकारपत्राद्वारे वाघोलीतील १० एकर जागा बळकावण्याचा प्रयत्न

बनावट अधिकारपत्राद्वारे वाघोलीतील १० एकर जागा बळकावण्याचा प्रयत्न

वाघोली - मुळ मालकाचे नावाने स्वतःचा फोटो लावून बनावट आधारकार्ड (Aadhar Card) तयार करून बनावट अधिकारपत्राद्वारे वाघोलीतील (Wagholi) 10 एकर जागा (Land) बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह तिघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

अनिल राजाराम सणस (वय 46, रा. टिंगरेनगर) यांच्या फिर्यादीनुसार सुमन दत्ता लोंढे (वय 30, रा. वारजे), मनोज एकनाथ शिंदे (वय 28, रा. शिरूर), राजेंद्र रमेश सोदे (वय 40, रा. वारजे माळवाडी) या तिघांविरोधात तीन लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी निधी देणार; आदित्य ठाकरे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुमन लोंढे या अपर्णा यशपाल वर्मा असल्याचे भासवून तिचे फोटोचे बनावट आधारकार्ड तयार केले. वर्मा यांच्या मालकीची वाघोली येथील 1276 मधील 10 जागा बळकाविण्याच्या हेतूने आर्थिक फायद्यासाठी जागेचे बनावट अधिकारपत्र विश्वनाथ कांबळे यांना नोटराईज करून दिले. अधिकारपत्र खरे आहे असे भासवून कांबळे यांच्याकडून 5 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. वर्मा व कांबळे यांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सामील आणखी इतर व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहे.

Web Title: Attempt To Grab 10 Acres Of Land In Wagholi Through Fake Power Of Attorney Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimewagholiLands
go to top