कोंढव्यात बनावट कागदपत्रांद्वारे जागा बळकाविण्याचा प्रयत्न

document
document
Updated on

कात्रज katraj - संस्था अवसायनाचे आदेश असतानाही बनावट सभासद तयार करुन प्लॉटचे बेकायदेशीर हस्तांतर करण्यात आल्याचा प्रकार कोंढव्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिध्दार्थ रविंद्र नहार, स्नेहल रविंद्र नहार (रा. ऋुतुराज सोसा. बिबवेवाडी) यांच्यासह सोसायटीचे देवेंद्र मोहनलाल कामदार (वय 80. रा. कोंढवा), श्रीकांत अनंत जोगदेव, सिध्दार्थ रविंद्र नहार, स्नेहल रविंद्र नहार, अजित शंकर मुळेकर, किरण बन्सीलाल चोरडिया यांच्यासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी योगेश संपत देशमुख (46, रा.लक्ष्मीनगर, पर्वती पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. (Attempt to grab space in Kondhwa through fake documents)

फिर्यादीनूसार योगेश देशमुख यांचे मित्र इरफान ताजमत हे सुशिक्षीत इंडस्ट्रीज ओनर्स को ऑप असोसिएशन या संस्थेचे १९८३ पासून सदस्य होते. त्यांनी 99 वर्षाच्या कराराने 470 चौरस मीटरचा प्लॉट घेतला होता. याचे कुलमुखत्यारपत्र योगेश संपत देशमुख यांना देण्यात आले होते. योगेश संपत देशमुख यांनी वकील राजेश खळदकर यांच्या मार्फत जागेचा सर्च रिपोर्ट तयार करीत असताना त्यांना असे आढळले की संस्थेच्या अनेक सभासदांच्या प्लॉट क्रमांकामध्ये अनाधिकृत बदल झाले आहेत तसेच मालकी हक्कामध्येही विसंगती आहे. तसेच उपनिबंधक कार्यालयाने 1996 साली संस्था विसर्जित करण्याचे आदेश काढले असताना देखील वर्षे 1996 नंतर संस्थेत अनेक बनावट सभासद तयार करुन संस्थेतील प्लॉटचे बेकायदेशीर हस्तांतरण करण्यात आले आहे.

document
नवीन कात्रज बोगद्याजवळ भरधाव दुचाकीचा अपघात; सिव्हिल इंजिनिअरसह पादचाऱ्याचा मृत्यू

नहार व इतर आरोपींनी 2009-2010मध्ये एकमेकांशी संगनमत करुन संस्थेच्या मुळ ले-आऊटमध्ये अनाधिकृत बदल घडवून ले-आऊट तयार केला तसेच आरोपी अजित मुळेकर व श्रीकांत जोगदेव हे संस्थेचे कधीही सभासद नसताना किंवा त्यांचा संस्थेशी काहीही संबंध नसताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने ते सभासद असल्याचे भासवून विविध बनावट दस्तऐवज तयार केलेले करून संस्थेच्या जागेचे बेकायदा हस्तांतर करण्यात आले. तसेच आरोपी व पदाधिकारी यांनी बनावट शेअर सर्टिफिकेट तयार करुन संस्थेतील प्लॉट नंबर जूने व नवे असल्याचे भासवून दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट दस्त तयार केलेले आहेत. यासंदर्भात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलीसांनी दिली. याप्रकरणी आणखी काही सभासदांची फसवणूक झाल्याची शक्‍यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com