esakal | नवीन कात्रज बोगद्याजवळ भरधाव दुचाकीचा अपघात; सिव्हिल इंजिनिअरसह पादचाऱ्याचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

death

नवीन कात्रज बोगद्याजवळ भरधाव दुचाकीचा अपघात; सिव्हिल इंजिनिअरसह पादचाऱ्याचा मृत्यू

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघांससह पादचारी गंभीर जखमी झाला. तिघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान दुचाकीस्वार स्थापत्य अभियंत्यासह पादचाऱ्याचा मृत्यु झाला. ही घटना मंगळवारी सांयकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास नवीन कात्रज बोगद्याजवळ घडली.

अभिषेक किशोर कदम (वय 25, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे अपघातात मृत्यु झालेल्या स्थापत्या अभियंत्याचे नाव आहे. तर मृत पादचाऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. पादचारी 35 ते 40 वयोगटातील असून त्याने निळ्या रंगाचा शर्ट, लुंगी परिधान केलेली आहे. राहूल दावणगावे (वय 26, रा. बिबवेवाडी) असे अपघातात जखमी झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.आर.कवठेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक व राहूल हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. दोघेही स्थापत्य अभियंते असून ते शहरातील बांधकाम प्रकल्पांवर काम करतात. अभिषेकने मंगळवारी सांयकाळी राहूलला आपल्या दुचाकीवर बसवून खेड शिवापुर येथे नेले होते. तेथून सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ते दोघेजण पुण्याकडे येत होते. त्यांची दुचाकी मुंबई-बंगळुरू महामागार्वरील नवीन कात्रज बोगद्याजवळ त्यांची दुचाकी आली.

हेही वाचा: मृतदेहाच्या दफनसाठी जागाच शिल्लक नाही

अभिषेक हा दुचाकी चालवित होता. त्यावेळी त्यांच्या भरधाव दुचाकीने अनोळखी व्यक्तीला उडविले. त्यानंतर दुचाकी घरून अभिषेक व राहूल हे दोघे तसेच दुचाकीची ठोकर बसल्याने व खाली पडल्यामुळे पादचारीही गंभीर जखमी झाला होता. तिघांनाही उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. अभिषेक व पादचारी दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यु झाला. तर राहूल दावणगावे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.