तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न; काय आहे प्रकरण

Crime
Crime

पुणे - धार्मिक स्थळाच्या बांधकामाच्या हिशेबावरून दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात एकावर तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला, तर अन्य व्यक्तींना लोखंडी दांडके, सळईने जबर मारहाण करण्यात आली. ही घटना रामटेकडी येथे घडली असून, याप्रकरणी दोन्ही गटांतील १७ हून अधिक जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पहिल्या गुन्ह्यात हरपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय ३०, रा. सोरतापवाडी, कुंजीरवाडी), नेपालसिंग मोहनसिंग कल्याणी (७२), हसपालसिंग नेपालसिंग कल्याणी (२८), तपालसिंग नेपालसिंग कल्याणी (४७), जगपालसिंग नेपालसिंग कल्याणी (४२), जसपालसिंग नेपालसिंग कल्याणी यांना अटक केली असून, अन्य व्यक्तींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कृष्णासिंग धारासिंग कल्याणी (वय ३७, रा. काकडेमळा, थेऊरनगर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी येथे धार्मिक स्थळाचे बांधकाम सुरू असून, त्यासंदर्भात गुरुवारी दुपारी बैठक सुरू होती. फिर्यादी, त्यांचा भाऊ, वडील व पुतण्या संबंधित धार्मिक स्थळाचे सदस्य आहेत. त्यांनी केलेल्या बांधकामाचा कमिटीला हिशोब मागितला. त्यावेळी फिर्यादी व आरोपींमध्ये जोरदार वादावादी झाली.

दरम्यान, याप्रकरणी नेपालसिंग मोहनसिंग कल्याणी (वय ७०, रा. सोरतापवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धारसिंग मोहनसिंग कल्याणी, जलसिंग धारासिंग कल्याणी, कृष्णासिंग धारासिंग कल्याणी, हिम्मतसिंग धारासिंग कल्याणी, जस्सीसिंग जलसिंग कल्याणी, रोहीतसिंग जलसिंग कल्याणी, रोहनसिंग कृष्णासिंग कल्याणी व इतर पाच ते सहा जणांवर गंभीर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहा ते आठ जण सराईत गुन्हेगार आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com