वडापावमुळं अब्रूचं खोबरं

सु. ल. खुटवड
Friday, 5 February 2021

मुले ही देवाघरची फुले आहेत, यावर आमचा पहिल्यापासून विश्‍वास आहे. त्यामुळे सोसायटीतील सर्वच मुलांशी आम्ही नेहमीच प्रेमाने वागत आलो आहोत. मुलांबरोबर क्रिकेट खेळणे हेही आम्हाला आवडते. त्यासाठी आम्ही बॅटही विकत घेतली आणि ज्याची बॅट, त्याचीच सतत बॅटिंग, असा नियम आहे.

मुले ही देवाघरची फुले आहेत, यावर आमचा पहिल्यापासून विश्‍वास आहे. त्यामुळे सोसायटीतील सर्वच मुलांशी आम्ही नेहमीच प्रेमाने वागत आलो आहोत. मुलांबरोबर क्रिकेट खेळणे हेही आम्हाला आवडते. त्यासाठी आम्ही बॅटही विकत घेतली आणि ज्याची बॅट, त्याचीच सतत बॅटिंग, असा नियम आहे. त्यामुळे आम्ही सतत बॅटिंग करत असतो. त्यामुळे मुले वैतागून जातात. मात्र, क्रिकेटचे नियम कोणासाठी थोडेच बदलता येतात? मुलांच्या वाढदिवसालाही आम्ही उपस्थित असतो. 

केकबरोबरच नाश्‍त्यावर मनोसक्त ताव मारतो आणि निघताना ‘रिटर्न गिफ्ट’ हक्काने मागून घेतो. दोन रुपयांच्या कॅडबरीमध्ये हे सगळे मिळत असल्याने आम्ही स्वतःवर खूष असतो. मात्र, मुलांचे आईवडील आम्हाला पाहून नाक मुरडतात. ‘दोन मुलांचा बाप झालाय, पण बालिशपणा काही जात नाही’ असे कुजबुजतात. आज सकाळी एका हॉस्पिटलमधील बाकड्यावर चार-पाच वर्षांचा निरागस मुलगा पाहून आम्ही त्याच्याशी संवाद वाढवला. त्याची आई केसपेपर काढण्यासाठी गेली होती व तो तिची वाट पाहत होता. आम्हीही मित्राच्या वडिलांना भेटण्यासाठी आलो होतो. तब्येतीची चौकशी करून, मित्राची वाट पाहत होतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरून लवकर निघाल्यामुळे भूकही जोराची लागली होती. त्यामुळे समोरच्या वडापाव सेंटरमधून तीन वडापाव खरेदी करून पिशवीत ठेवले होते. त्यातील एक वडापाव आम्ही खाऊ लागलो. तो लहान मुलगा आमच्याकडे एकटक पाहू लागला. ‘बाळा, भूक लागली आहे का’? आम्ही प्रेमाने विचारले. त्याने मान डोलावली. मग आम्ही पिशवीतील वडापाव काढून त्याला दिला. ‘काका, सकाळपासून पाण्याचा थेंबही पोटात नाही. खूप भूक लागली होती.’ मग आम्ही खाता- खाता ‘तुझा वाढदिवस कधी आहे? आम्हाला बोलवणार का वाढदिवसाला?’ असा प्रश्‍न विचारला. त्यानेही पुढच्या आठवड्यात वाढदिवस असल्याचे सांगितले. मग आम्ही तारीख व त्याचा पत्ता लिहून घेतला. क्रिकेट खेळतो का? असंही त्याला विचारलं. त्यावर आपण चांगले बॉलर असल्याचे सांगितले. त्याचे हे उत्तर ऐकून आमची मैत्री चांगलीच जुळणार, अशी चिन्हे दिसू लागली. तेवढ्यात त्या मुलाची आई तिथे आली व मुलाच्या कानाखाली लावली. 

पुणेकरांनो, सातारा रस्त्यावर आजपासून ‘बीआरटी’

‘अहो, लहान मुलांना असे मारू नये. मुले ही देवाघरची फुले असतात,’ असे आम्ही त्यांना समजावून सांगितले. त्यावर त्या माऊलीने रूद्रवतार धारण केला. ‘उपाशीपोटी मुलाच्या काही टेस्ट करायच्या आहेत म्हणून त्याला रात्रीच्या जेवणानंतर काही खायला दिलं नाही. मी केसपेपर काढायला गेले तर हा इकडे वडापाव खातोय. शंभर रुपये खर्च करून आम्ही रिक्षाने आलोय. आता तेवढेच पैसे खर्च करून घरी जायचंय, ते सगळं वाया गेलं ना. शिवाय वरून त्रास झाला तो वेगळाच.’ असे म्हणून त्यांनी आम्हाला चांगलंच फैलावर घेतलं.

‘आरटीओ’ला अंधारात ठेवून ‘बाइक शेअर’;‘उबर’तर्फे दुचाकी प्रवासी वाहतूक सेवा

‘तो मुलगा आहे, त्याला अक्कल नाही; पण तुम्हाला कळायला नको. तुमचा मेंदू काय गुडघ्यात आहे का? तुम्ही त्याला वडा पाव खायलाच का दिला.’ असे म्हणून त्या माऊलीने आमच्या इज्जतीचा पंचनामा केला. आता आमच्याभोवती बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. मार पडतोय का काय, अशी भीती वाटू लागली. शेवटी आम्ही पाचशे रुपयांची नोट काढून त्या माऊलीच्या हातात दिली. ‘सॉरी. उद्या रिक्षाने परत या.’ असे आम्ही म्हटले. त्यानंतर डायरीतून त्या मुलाच्या वाढदिवसाची तारीख व पत्ता खोडून काढला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sl Khutwad writes about vadapav