esakal | श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भीमाशंकर मंदिरात फुलांची आकर्षक सजावट
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भीमाशंकर मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भीमाशंकर मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलवडे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे पाचव्या श्रावणी सोमवार निमित्ताने मंदिरात पहाटे ५ वाजता शिवलिंगाची विधिवत पूजा देवस्थान ट्रस्टच्या वतीने पार पडली. गाभाऱ्यात विविधरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून कोरोनाच्या साथरोग महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांनी भगवान श्री.शिवशंकराची घरातच पूजा, आराधना करून मंदिर प्रशासन व पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune News)

हेही वाचा: पंजशीरमध्ये पाकिस्तानी Air Force कडून बॉम्बफेक

पोलिस प्रशासनाच्या वतीने ४ अधिकारी, ३५ पोलिस कर्मचारी व ४० होमगार्ड भीमाशंकर, पालखेवाडी व डिंभे येथील चेकपोस्टवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील पर्यटनस्थळे व भीमाशंकर मंदिर परिसरात संचारबंदी लागू असल्याने भाविकांनी व पर्यटकांनी भीमाशंकर परिसरात प्रवेश करू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आवाहन घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.

loading image
go to top