esakal | पंजशीरमध्ये पाकिस्तानी Air Force कडून बॉम्बफेक
sakal

बोलून बातमी शोधा

पंजशीरमध्ये पाकिस्तानी Air Force कडून बॉम्बफेक

पंजशीरमध्ये पाकिस्तानी Air Force कडून बॉम्बफेक

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: पंजशीर (panjshir) तालिबानला (Taliban) जिंकता यावे, यासाठी पाकिस्तान (pakistan) त्यांना मदत करत असल्याचे वृत्त आहे. पंजशीर हा अफगाणिस्तानातला एकमेव प्रांत आहे, जिथे तालिबानला नियंत्रण मिळवता आलेले नाहीय. यापूर्वी सुद्धा तालिबान आणि रशियन फौजांना पंजशीरमध्ये विजय मिळवता आला नव्हता. सध्या पंजशीरमध्ये घनघोर लढाई (war) सुरु आहे. दिवंगत नेते अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली नॅशनल रेसिस्टन्स फोर्सच्या फौजा तालिबान विरोधात लढा देत आहेत.

पंजशीरमध्ये पाकिस्तानी एअर फोर्सच्या ड्रोन्सचा वापर करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. ड्रोन्समधून पंजशीरमध्ये बॉम्बफेक करण्यात आली आहे. पंजशीरमध्ये स्मार्ट बॉम्बने हल्ला करण्यात आल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. पंजशीरमध्ये पाकिस्तान तालिबानला फक्त हवाई मदतच करत नाहीय, तर रेसिस्टन्स फोर्सशी लढण्यासाठी काही स्पेशल फोर्सेसही एअर ड्रॉप करण्यात आल्या आहेत, सीएनएन न्यूज १८ ने हे वृत्त दिलेय.

हेही वाचा: सरकार बनण्याआधीच हाणामारी, तालिबानचा प्रमुख मुल्ला बरादर जखमी

तालिबानने पंजशीरकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. पुरवठा रोखून धरला आहे. सध्या सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये तालिबान आणि रेसिस्टन्स फोर्स दोन्ही बाजूला मोठी मनुष्यहानी झाली आहे.

हेही वाचा: पंजशीर तालिबान जिंकणार, अहमद मसूदकडून युद्ध थांबवण्याची मागणी

अमरुल्लाह सालेह काय म्हणाले...

आपल्या मार्गात भूसुरुंग (mine) तर पेरलेले नाहीत ना? याची खातरजमा करुन घेण्यासाठी तालिबान पंजशीरमधल्या (Taliban panjshir) वयोवृद्ध सैनिकांचा 'माइन क्लियरन्स टुल' (mine clearance tool) म्हणून वापर करतेय असा आरोप अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह (Amrullah Saleh) यांनी केला आहे. अमरुल्ला सालेह यांनी तालिबान युद्ध गुन्हे करत असल्याचा आरोप केलाय.

तालिबानकडून मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरु आहेत. या कट्टरपंथीय गटाला आंतरराष्ट्रीय मानवी कायद्याबद्दल अजिबात आदर नाहीय. संयुक्त राष्ट्राने त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे सालेह यांनी म्हटले आहे

loading image
go to top