Atul Save: भटके-विमुक्तांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न: मंत्री अतुल सावे यांची माहिती; भिवडीत राजे उमाजी नाईक जयंती

Atul Save Highlights Empowerment of Nomadic Tribes in Bhiwdi: भटके-विमुक्त, व्हीजेएनटी, ओबीसी व एसबीसी समाजासाठी शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर; महायुती सरकारकडून सक्षमीकरणाचे आश्वासन
Atul Save Announces Focus on Education Employment Skills and Self Employment for Nomadic and Vimukta Communities

sakal

Updated on

परिंचे : ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार समाज घटकांच्या विकासासाठी कायमच तत्पर आहे. आजच्या काळातील आव्हाने बदलली आहेत. त्यामुळे समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची संधी, रोजगाराचे मार्ग, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि मूलभूत सुविधा यांना अधिक महत्त्व आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून भटके-विमुक्त, व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी या समाजातील नागरिकांना या विविध क्षेत्रांत पुढे जाण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे,’’ असे मत इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com