
Aundh Post Office
esakal
पुणे : औंध टपाल कार्यालयात आता अत्याधुनिक पार्सल पॅकेजिंग युनिटची सेवा उपलब्ध झाली आहे. औंध आणि बाणेर परिसरातील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांना परदेशात पार्सल पाठवताना दर्जेदार पॅकिंगची गरज भासत होती. याआधी ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना पुणे प्रधान डाकघर, पर्वतीपर्यंत जावे लागत होते.