esakal | अनैतिक संबंधाचा संशय; मावशीने केली 3 वर्षाच्या मुलाची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

अनैतिक संबंधाचा संशय; मावशीने केली 3 वर्षाच्या मुलाची हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - चुलत बहीणीचे आपल्या पतीसमवेत अनैतिक संबंध (Immoral Relationship) असल्याच्या संशयावरुन (Suspicion) एका महिलेने चुलत बहिणीच्या तीन वर्षांच्या मुलाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये. महिलेने तीन वर्षांच्या मुलाला लिफ्टच्या (Lift) डक्‍टसाठीच्या खड्ड्यात (Duct) साठविलेल्या पाण्यात बुडवून त्याची हत्या केली. मार्केट यार्ड येथील लेबल कॅम्पमध्ये हा प्रकार घड घडली. याप्रकरणी एका महिलेस मार्केट यार्ड पोलिसांनी (Police) अटक केली. (Aunt Suspects Murder of 3 Year Old Boy in Immoral Relationship)

चाकेन वर्मा (वय 3) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तर निर्मला वैलास वर्मा (रा. लेबर कॅम्प, मार्केट यार्ड) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलाचे वडील अवधेश वर्मा (वय 27 ) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड परिसरातील लेबर कॅम्पमध्ये वर्मा कुटुंबीय राहतात. अवधेशची पत्नी वैलाणी वर्मा व संशयित आरोपी निर्मला या दोघीही चुलत बहिणी आहेत. त्या एकाच ठिकाणी काम करीत असल्याने लेबर कॅम्पमध्येच जवळजवळ राहतात. दरम्यान, चुलत बहीण वैलाणी हिचे निर्मलाचा पती वैलास याच्या समवेत अनैतिक संबंध असल्याचा संशय निर्मलाला होता. त्याचाच राग निर्मलाच्या मनात होता.

हेही वाचा: पुण्यातील तरुणांनी घेतला रुग्णसेवेचा वसा; हजारो रुग्णांना मिळतोय आधार

दरम्यान, 1 मे रोजी सायंकाळी सात वाजता वैलाणीचा मुलगा चाकेन हा त्यांच्या घराजवळ खेळत होता. त्यावेळी निर्मलाने चाकेनला उचलून नेले. त्यानंतर तिने चाकेनला बांधकाम प्रकल्पावरील लिफ्टच्या डक्‍टसाठी केलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडवून त्याचा खुन केला. या घटनेनंतर निर्मला कामावर निघून गेली. घराभोवती मुलगा दिसत नसल्याने वैलाणी व अवधेश यांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही, दरम्यान, त्याच दिवशी त्यांना लिफ्टच्या पाण्याच्या डक्‍टमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, त्यावेळी चाकेनचा त्याच्या चुलत मावशीनेच खुन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा