कर्जाच्या हफ्त्यास डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी; बारामतीतील रिक्षाचालकांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

- रिक्षाचालकांनी केल्यात विविध मागण्या.

बारामती : लॉकडाऊनचे भीषण परिणाम आता सर्वांनाच जाणवू लागले आहेत. त्यातही हातावरचे पोट असलेल्या रिक्षाचालकांची गेल्या दोन महिन्यांपासून उपासमार सुरु असल्याने आता मदतीचा हात द्या, अशी आर्त हाक त्यांच्याकडून दिली जात आहे.
 बारामतीतील रिक्षाचालकांनी सोमवारी एकत्र येत उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या दोन महिन्यांपासून रिक्षा बंद आहेत. मात्र, प्रपंच सुरु आहेत, रोजचे खर्च संपत नाहीत. हातात मात्र एक रुपयाही नाही, अशी स्थिती झाल्याची व्यथा मांडत, काहीतरी मदत करा, अशी हाक त्यांनी दिली. उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या मांडत त्यांनी आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. येथील धो. आ. सातव चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रशांत नाना सातव, महाराष्ट्र मानवी हक्क संघटनेचे शहराध्यक्ष मुनीर तांबोळी यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना व राष्ट्रवादी कॉंग्रेस अॅटो रिक्षा संघटनेने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत मागण्यांचे निवेदन दिले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या निवेदनावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना बारामतीचे अध्यक्ष आण्णा समिंदर, सचिव सागर सोनवणे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस ऑटो  रिक्षा संघटना तीन हत्ती चौक बारामतीचे अध्यक्ष दादा शिंदे व सचिव सखाराम सोनवणे आदींच्या सह्या आहेत.  यावेळी अजित साळुंके, रमेश जाधव, शिवाजी जाधव, सागर जाधव आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आहेत रिक्षाचालकांच्या मागण्या...

- मार्च ते डिसेंबर 2020 पर्यंत नोंदणीकृत रिक्षाचालकांना परिवहन विभागामार्फत 10 हजार अर्थसहाय्य मिळावे.

- पुढील 2 वर्षापर्यंत रिक्षासंबंधी पासिंग, विमा कर सरकारने माफ करावे

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- दरवर्षी पासिंग व विम्याची 10 ते 12 हजार रूपये रक्कम प्रत्येक रिक्षाचालक जमा करतो.  त्या मोबदल्यात विम्याचा कोणताही मोबदला मिळत नाही. चालकाने पहिल्या वर्षी क्लेम केला नाही तर  पुढील वर्षी विमा घेऊ नये म्हणजे 1 वर्षाच्या विम्यामध्ये 2 वर्षाचे विमा संरक्षण मिळावे.

- लॉकडाऊननंतर रिक्षा सुरू झाल्यानंतर सरकारने उच्च प्रतीचे मास्क, हॅण्डग्लोव्हज्, सॅनिटायझर व इतर आवश्यक सुविधा पुरवाव्यात, महिन्यातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी करण्यात यावी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- चालक मालकांना सरकारने 20 लाखांचा विमा व 5 लाख रूपयांचा वैद्यकीय विमा काढावा. म्हणजे यापुढे वाहतूक करताना कोरोनाचा संसर्ग झाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.

- पुढील दोन वर्षांची मुलांची शैक्षणिक फी सरकारने माफ करावी. 

- संसर्ग होऊ नये म्हणून रिक्षाचालक व प्रवासी यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राहील अशा पद्धतीने यापुढील काळात रिक्षाची बांधणी करावी.

- सध्या रिक्षाचालक व मालकांच्या कुटुंबियांची उपासमारी थांबविण्यासाठी दोन महिन्यांचा किराणा सामानाचे वाटप त्वरीत करण्यात यावे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- रिक्षावर असणार्‍या कर्जाचा मासिक हप्त्यास 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी व व्याज माफ करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे कऱण्यात आल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auto Drivers Demanding to solve Various issues to State Government