ॲप माझे

ॲप माझे
Published on

ॲप माझे
---------
हेडिंग-

‘एआय’ चित्रकला सहाय्यक
----------
ॲपचे नाव-

ऑटोड्रॉ (संकेतस्थळ)
----------
कुणासाठी?
- संगणकावर चित्रे काढू इच्छिणाऱ्या कुणाहीसाठी.
-----------
मित्रमैत्रिणींनो, संगणकांमध्ये ‘मायक्रोसॉफ्ट पेंट’ हे चित्र काढायचे ‘टूल’ (साधन) असते. साध्या ‘पेंट टूल’च्या एक पाऊल पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचा चित्रे काढण्यासाठी उपयोग करणारे साधन आहे- ‘ऑटोड्रॉ’. त्याला हे एक ‘एआय असिस्टेड डूडलिंग टूल’ असे म्हणतात. ‘गुगल क्रिएटिव्ह लॅब’ने निर्माण केलेले हे टूल मोफत आहे. https://www.autodraw.com/ या संकेतस्थळावर जाऊन ते संगणक वा मोबाईलवर वापरता येते.
-------------
काय वेगळे?

- तुम्ही ‘मायक्रोसॉफ्ट पेंट’ वापरले असेल, तर तुम्हाला ‘ऑटोड्रॉ’ सहज वापरता येईल. माउस वापरून चित्र काढणे सोपे नाही, याचा अनुभव तुम्ही घेतला असेल. आपण वेड्यावाकड्या रेषा काढल्या, की या टूलमधील ‘एआय’ आपण कशाचे चित्र काढत आहोत, हे ओळखतो. चित्रात बदल करण्यासाठी आपल्याला पर्याय दाखवतो. उदा. आपण होडीसारखा दिसणारा- पण वेडावाकडा आकार काढताच एआय आपल्याला त्या आकारासारखे सुबक आकार दाखवतो. त्यांवर क्लिक केले की चांगली होडी स्क्रीनवर दिसू लागते.
- चित्रासाठी हवा तो रंग निवडता व चित्रात भरताही येतो. बॅकग्राउंड बदलता येते.
- चित्रात मजकूर (टेक्स) समाविष्ट करता येते, ‘शेप’ टूल वापरून भौमितीय आकार काढता येतात.
- आपण काढलेले चित्र लहान-मोठे करता येते, त्याची जागा बदलता येते. शेवटी
आपले चित्र ‘डाउनलोड’ वा ‘शेअर’ करता येते.संगणक व मोबाईल दोन्हीवरून हे संकेतस्थळ वापरता येते.

------------
कसा उपयोग करून घेता येईल

- अभ्यासाच्या पुढे जाऊन मुले या टूलच्या साह्याने बरेच काही करू शकतात. उदा. एखादी स्वत:ची ‘कॉमिक स्ट्रिप’ तयार करणे. एखाद्याला विनोद सुचतात, गोष्ट/ कविता सुचते. ती चित्रांच्या आधाराने मांडावीशी वाटते, पण त्याची चित्रकला उत्तम असेलच असे नाही. अशा वेळी हे टूल कामी येईल. आपली कला लोकांसमोर ठेवणे अशा साधनांमुळे सोपे होईल.
- अवघड धड्यांच्या नोट्स तयार करताना हे टूल वापरून आकृत्या व मजकूर समाविष्ट करता येतील. वर्गात एखादे सादरीकरण (प्रेझेंटेशन) करताना त्याचा उपयोग करता येईल.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com