Warje Bus Stop Problem : वारज्यात बसथांब्यावर रिक्षाचालकांची दादागिरी; कर्वेनगरमध्ये प्रवाशांसह बसचालकही त्रस्त, कारवाईची आवश्यकता
Karvenagar Bus Driver Harassment News : वारजे-कर्वेनगर परिसरातील बसथांब्यावर रिक्षाचालकांची मनमानी सुरू असून प्रवासी आणि बसचालक त्रस्त झाले आहेत. स्थानिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कर्वेनगर : वारजे, कर्वेनगर परिसरातील बसथांब्यावर रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सुरू असतो. यामुळे बसने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. हे रिक्षाचालक बसथांब्याजवळ रिक्षा उभी करून बस येण्याच्या वेळीच भाडे मिळविण्यासाठी गर्दी करतात.