

Government Engineering College, Avsari Khurd signs an MoU with Jabil Circuits India to boost research, industrial training, skill development and job opportunities.
Sakal
मंचर : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय आणि जागतिक दर्जाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी जाबील सर्किट्स इंडिया लिमिटेड, रांजणगाव (पुणे) यांच्यात मंगळवारी(ता.११) संशोधन, औद्योगिक प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या नव्या संधी मिळणार आहेत.