पुणे : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Avinash Bhosale arrested by CBI DHFL Yes bank loan case promoter of ABIL group of companies

पुणे : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक

पुणे : डीएचएफएल प्रकरणात तीनशे कोटीपेक्षा जास्तची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परिसरात सीबीआयने छापेमारी केली होती, त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. (Avinash Bhosale Arrested by cbi)

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व उद्योजक अविनाश भोसले यांना येस बॅंक आणि डीएचएफएल बॅंक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी अटक केली. भोसले यांच्या घरावर एप्रिल महिन्यातच सीबीआयने छापे घातले होते. तर मागील वर्षी "सीबीआय'ने त्यांची तब्बल 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

हेही वाचा: चेन्नईत PM मोदींकडून 31 हजार कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ

मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास "सीबीआय'कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे. दरम्यान, याच बॅंक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, "सीबीआय'कडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिर महिन्यात "सीबीआय'ने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्वाची कागदपत्रेही त्यांनी जप्त केली होती.

हेही वाचा: Video : IPS दीपक पांडेंचा अनोखा अंदाज, ख्रिस गेलसोबत धरला ठेका...

दरम्यान, "सीबीआय'ने मागील वर्षी भोसले यांच्या मुंबई व पुण्यातील "एबीआयएल' कंपनी, घरमध्येही छापे टाकले होते. तसेच भोसले व त्यांच्या कुटुंबाच्या 40. 34 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, उद्योजक असून त्यांचा मुंबई व पुण्यात बांधखाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील भोसलेनगर व डेक्कन जिमखाना परिसरात त्यांची प्रशस्त कार्यालये आहेत. तर पाषाणमध्ये येथे भोसले यांचे आलिशान निवासस्थान आहे. भोसले यांना यापूर्वीही विदेशातून कर चुकवून मौल्यवान चीजवस्तू घेऊन येताना सीमाशुल्क विभागाने विमानतळावर ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गुरुवारी सायंकाळी भोसले यांना त्यांच्या घरातुन अटक केली.

Web Title: Avinash Bhosale Arrested By Cbi Dhfl Yes Bank Loan Case Promoter Of Abil Group Of Companies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv SenaCBI
go to top