

30-Year-Old Avinash Kudale Secures Major Victory in Pune ZP Polls
Sakal
यवत/ खुटबाव : कसलीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना गेल्या १० वर्षांपासून गावातील सर्व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणारा यवत (ता. दौंड) येथील अविनाश कुदळे आता जिल्हा परिषद झाल सदस्य झाला आहे. आमदार राहुल कुल यांनी केलेली निवड, ज्येष्ठांचे आशीर्वाद व तरुणांच्या सहकार्याने वयाच्या तिशीमध्ये अविनाश जिल्हा परिषदेची पायरी चढणार आहे. अटीतटीच्या लढतीमध्ये अविनाश यांनी अमित कुदळे यांचा २६५ मतांनी पराभव केल्याने २५ वर्षानंतर यवत- बोरीभडक गट आमदार कुल यांच्या ताब्यामध्ये आला.