esakal | गर्दी टाळा, ऑनलाईन दर्शनालाच प्राधान्य द्या - डॉ.रविंद्र शिसवे, पोलिस सहाआयुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

गर्दी टाळा, ऑनलाईन दर्शनालाच प्राधान्य द्या - डॉ.रविंद्र शिसवे, पोलिस सहाआयुक्त

गर्दी टाळा, ऑनलाईन दर्शनालाच प्राधान्य द्या - डॉ.रविंद्र शिसवे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : "पुणेकरांनी मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही दिड दिवसांच्या गणपतीचे घरी व महापालिकेच्या हौदात विसर्जन करून स्वयंशिस्त पाळली. याच पद्धतीने पुढील दिवसातही मुखदर्शनासाठी गर्दी करण्याचे टाळून ऑनलाईन दर्शनालाच प्राधान्य द्यावे. त्यामुळे कोरोनामुळे निर्माण होणारा धोका कमी होऊ शकेल,'' असे आवाहन पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी रविवारी केले.

गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागात नागरीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या पार्श्‍वभुमीवर डॉ.शिसवे यांनी नागरीकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. शिसवे म्हणाले, ""दिड दिवसांच्या गणपतींचे याही वर्षी घाटांवर विसर्जन न करतान नागरीकांनी घरी व महापालिकेच्या हौदात करून शासनाच्या आचारसंहीतेचे पालन केले. हिच स्वयंशिस्त पुढील काही दिवस पाळायची आहे. काही मंडळे रस्त्यांवर असल्याने नागरीक ये-जा करताना श्रींचे दर्शन घेतात. त्यामुळे रस्त्यावर काही प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. म्हणूनच नागरीकांनी मुखदर्शनाऐवजी ऑनलाईन दर्शनालाच प्राधान्य द्यावे.''

हेही वाचा: "CM नहीं PM बदलो! मुख्यमंत्री बदलण्याने मोदींचं अपयश झाकणार नाही"

वाहतुकीबाबत शिसवे म्हणाले, "मध्यवर्ती भागात होणारी गर्दी लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीमध्ये बदल केले जातील. काही रस्तेही बंद ठेवावे लागतील. त्यामुळे पादचारी व नागरीकांना त्रास होऊ शकतो. त्यादृष्टीने नागरीकांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी.''

loading image
go to top