माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामती नगरपरिषदेला पारितोषिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati Muncipal corporation

माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामती नगरपरिषदेला पारितोषिक

बारामती - राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बारामती नगरपालिकेला पारितोषिक जाहीर झाले आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नगरपालिकापैकी एक म्हणून बारामती नगरपालिकेला रविवारी (ता. 5) मुंबईत सन्मानित करण्यात येणार आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये नगरपरिषद गटांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नगर परिषदेमध्ये बारामती नगरपरिषदेचा समावेश करण्यात आला आहे. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी बारामती नगरपालिकेने केलेल्या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने हा पुरस्कार बारामती नगरपालिकेला देण्यात आला आहे.

बारामती नगरपालिकेने गेल्या काही महिन्यांमध्ये स्वच्छता अभियानाच्या बाबतीत घेतलेला पुढाकार व बारामती शहरांमध्ये केलेले वेगवेगळे बदल यांची दखल घेत या पुरस्कारासाठी बारामती नगरपालिकेची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी व बारामती नगरपालिकेचा आरोग्य विभाग व इतर सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे.

Web Title: Award To Baramati Municipal Council Under Mazi Vasundhara Abhiyan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top