
इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या (आय.एम.ए.) महाराष्ट्र शाखेच्या वतीने दिला जाणारा कोरोना वॉरीयर पुरस्कार बारामतीच्या डॉ. हर्षवर्धन व्होरा व सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जगताप यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
बारामती : इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या (आय.एम.ए.) महाराष्ट्र शाखेच्या वतीने दिला जाणारा कोरोना वॉरीयर पुरस्कार बारामतीच्या डॉ. हर्षवर्धन व्होरा व सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जगताप यांना नुकताच प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह देऊन या दोघांचा गौरव करण्यात आला. आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक तांबे यांनी ही माहिती दिली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर रुग्णांना दिलासा देण्यासह स्वताःच्या जिवावर उदार होऊन काम केल्याबद्दल या दोन डॉक्टरांना गौरविण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात आजपर्यंत देशभरात सुमारे सातशे डॉक्टरांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत, असे डॉ. तांबे यांनी सांगितले. संसर्गाचा कमालीचा धोका असतानाही काळजी घेत रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी शासकीय व खाजगी दोन्ही क्षेत्रातील डॉक्टरांनी राज्याच्या कानाकोप-यात मोलाची कामगिरी बजावली.
त्याचीच दखल घेत आयएमएच्या माध्यमातून अशा डॉक्टरांना गौरविण्यात आले आहे. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात कार्यरत डॉ. महेश जगताप यांनी या काळात केवळ बारामतीच नव्हे तर पंचक्रोशीतून आलेल्या रुग्णांवर उपचार केले. डॉ. हर्षवर्धन व्होरा यांनीही या काळात कोरोनाचे संकट कमी करण्यासह विविध उपाययोजना आखण्यात मोलाची मदत केली. त्यांनी वैद्यकीय व्यावसायिकांसह शासकीय यंत्रणेलाही मोलाची मदत केली, त्याची दखल घेत त्यांना गौरविले गेले आहे.
- सरळसेवा भरती MPSC मार्फतच करा; जिल्हाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचं निवेदन
डॉक्टरच उभारणार निधी...
कोरोनाच्या संकटाच्या काळात सातशेहून अधिक डॉक्टरांना देशभरात प्राण गमवावे लागल्यानंतर विम्याचे कवच नसलेल्या खाजगी क्षेत्रातील डॉक्टरांसाठीचा एक स्वतंत्र निधी उभारणार असल्याचे डॉ. अशोक तांबे यांनी सांगितले. दुर्देवाने एखाद्या डॉक्टरवर असा प्रसंग ओढवल्यास त्याला काही मदत या निधीतून करण्याचे नियोजन आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)