esakal | भवानी पेठ येथे महिलांच्या अत्याचाराविरुद्ध जनजागृती पोस्टर प्रदर्शन अभियान |Pune
sakal

बोलून बातमी शोधा

भवानी पेठ येथे महिलांच्या अत्याचाराविरुद्ध जनजागृती पोस्टर प्रदर्शन अभियान

भवानी पेठ येथे महिलांच्या अत्याचाराविरुद्ध जनजागृती पोस्टर प्रदर्शन अभियान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : समाजात वावरत असताना महिला व तरुणींना अपप्रवृत्तीच्या लोकांकडून होणार्‍या अत्याचाराविरुद्ध जनजागृतीपर पोस्टर प्रदर्शन, भवानी माता मंदिर, भवानी पेठ येथे भरविण्यात आले.नगरसेविका, मनीषा संदीप लडकत, यांच्या पुढाकारातून, यार्दी वस्ती विकास प्रकल्प यांच्या मदतीने "महिला छेडछाड" विरोधी जनजागृतीपर प्रदर्शनातून स्त्रीशक्ती सबलीकरण करण्यात आले. ह्या माहितीपर पोस्टर प्रदर्शनाला महिला भगिनींनी व युवतींनी चांगला प्रतिसाद दिला.

स्त्री पुरुष समानता, महिलांचे हक्क, शिक्षण, निर्भयतापूर्ण वातावरण, महिला सबलीकरण, माणूस म्हणून महिलांना मान सन्मान देणे यातूनच आपण युवतींना, महिलांना ताकद देऊन त्यांच्या पंखांना बळ देऊ असे मत मनीषा लडकत यांनी व्यक्त केले. तर यार्दीचे स्वानंद साठे यांनी प्रत्येक पोस्टर चा संदेश समजावून सांगितला.

या प्रसंगी यार्दीच्या समूह संघटिका वैशाली वणवे, स्वानंद साठे, साईबाबा वसाहत वायडीपी पियर टीम, सौरभ गायकवाड, शर्वरी व आर्य पडवळ, रौनक भोंसले,प्रांजली वणवे, शुभम व दिव्या खंडागळे, सुदर्शन व तुषार दंडगव्हाळ, गायत्री भगत, अजिंक्य चिंगरे, मधुरा चव्हाण, सोनी गायकवाड, रोनक भोसले, आयान, तोशिफ बागवान, श्रावणी निकम, साक्षि शिंदे, सुकृत कोंडे, अनिता जैन, फरांदे तसेच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

loading image
go to top