esakal | डाळज येथील राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियम संदर्भात जनजागृती
sakal

बोलून बातमी शोधा

डाळज येथील राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियम संदर्भात जनजागृती

डाळज येथील राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियम संदर्भात जनजागृती

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज ( ता. इंदापूर ) हद्दीत राष्ट्रीय महामार्गक्रमांक ६५ वर मृत्युंजय दूत व महामार्गावरुन येणारे जाणारे वाहन चालक यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. इंदापूर महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उप निरीक्षक डी. ए. सांगळे यांच्यानेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. मृत्युंजय दूत संकल्पना तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली.

हेही वाचा: चास-कमान धरणातून पुन्हा विसर्ग सुरू

यावेळी पोलीस उपनिरीक्षक डी. ए. सांगळे म्हणाले, आपला जीव अनमोल असल्याने मोटार सायकल चालवितांना नेहमी हेल्मेट चा वापर करणे गरजेचे आहे. वाहनचालविताना मोबाईल फोनचा वापर टाळणे गरजेचे असून अत्यावश्यक फोन असल्यास आपली गाडी रस्त्याच्या कडेला घेवून बोलणे गरजेचे आहे.

मोटर सायकल वर ट्रिपल सिट प्रवास हा कायद्याने गुन्हा आहे. मद्यप्राशन करूनवाहन चालवल्यास अपघात होवू शकतो. त्यामुळे आपला व समोरच्या व्यक्तीच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे कौटुंबिक, आर्थिक व समाजीक प्रश्न निर्माण होवू शकतात. त्यामुळे योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. ओव्हरटेक करतांना समोरील रोडवरून वाहन येत नसल्याची खात्री करून उजव्या बाजूने ओव्हरटेक करणे गरजेचे आहे. वाहन चालविताना वेग मर्यादाचे पालन करणे गरजेचे असूनचुकीच्या बाजूने वाहन चालवू नये.

हेही वाचा: भाटघर धरण काही तासांत भरणार

अपघातात जखमी लोकांना गोल्डन मिनिटात मदत केल्यास अनेकांना जीवदान मिळू शकते. लहान मुलांना मोटार सायकल चालविण्यास देवू नये. त्यांचाअपघातझाल्यास ज्यांच्या नावावर मोटार सायकल आहे,त्यांना त्रास होऊ शकतो. चारचाकीवाहनचालवताना नेहमी स्वसंरक्षणासाठी सिटबेल्ट वापरणे गरजेचे आहे. जे लोक या अकरा नियमांचे पालन करतील, त्यांचा अपघातापासून जरूर बचाव होवू शकतो अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.

loading image
go to top