esakal | पुण्यात मशिदीवरील भोंग्यातून जागृती...
sakal

बोलून बातमी शोधा

janwadi111.jpg

जनवाडीतील स्तुत्य उपक्रम

पुण्यात मशिदीवरील भोंग्यातून जागृती...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या संकटात जनजागृतीसाठी सरकारकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न होत असताना, सामाजिक संस्था धार्मिक प्रार्थनास्थळे व समाजसेवक या संकट काळात काम करताना दिसतात. असाच एक आदर्श जनवाडीत सध्या पहायला मिळत आहे. 

आणखा वाचा- माजी मुख्यमंत्री म्हणतात, `आळंदी पॅटर्न` राज्यात राबवा

जनवाडी येथील अरुण कदम चौकातील मशिदीच्या भोंग्यातून एरवी नमाज ऐकू येतो. मात्र, सध्या कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे येथील भोंगा बंद होता. मात्र, जनवाडी मशीद ट्रस्टने या भोंग्याचा धार्मिक कार्यक्रमापुरताच वापर न करता, कोरोना जनजागृतीसाठी सुरू केला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा  

रोज सकाळी अकराच्या सुमारास भोंग्यावर सोशल डिस्टन्स, लॉकडाउनचे पालन कसे करावे, नागरिकांसाठी नवीन काही सूचना असतील तर त्या विषयी जनजागृती करण्यात येत असून, परिसरातील आजी- माजी लोकप्रतिनिधी व पोलिस अधिकारी रोज विविध विषयांवर प्रबोधन करीत आहे. या परिसरात हे अनोखे प्रबोधन परिणामकारक ठरत आहे.