esakal | चिमुकल्या अयानची इंडिया बुकमध्ये नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

अयान जाधव

चिमुकल्या अयानची इंडिया बुकमध्ये नोंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरूड : अवघे २ वर्ष ११ महिने वय असणारा अयान जाधव हा चिमुकला आपल्या अगाध ज्ञानाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या खेळण्या-बागडण्याच्या वयातच त्याने केलेल्या पाच रेकॉर्डची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे हे विशेष.

हेही वाचा: पुण्याजवळील घाटमाथ्याला ‘ऑरेंज अलर्ट’

कोरोना आल्यामुळे मुलांना घरालाच आपले क्रीडांगण बनवावे लागले आहे. छोट्याशा घरामध्ये मुलांना कसे व्यस्त ठेवायचे हा प्रत्येक आईप्रमाणे अयानच्या आईलाही प्रश्न पडला. लहान मुलांना टीव्ही व मोबाईलमध्ये रमवण्यापेक्षा त्यापासून दूर ठेवणेच योग्य, याची जाण असलेल्या अक्षया जाधव यांनी अयानला निरनिराळी पुस्तके वाचून दाखवायला सुरुवात केली. त्याच्या प्रश्नांची उत्तरे नुसती न देता त्या चित्ररूपी नकाशे अयानला दाखवायच्या. अयानला नकाशाची आणि खगोल शास्राची खुपच आवड आहे,

हेही वाचा: नगरसेविका बारसे यांचा आमदार लांडगे यांना घरचा आहेर

हे लक्षात घेवून त्या दृष्टीने त्यांनी अयानला माहिती देण्यास सुरुवात केली. त्याचा चांगला परिणाम झाला. वडील नितीन जाधव यांनी अयानचे व्हिडिओ तयार करुन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला पाठवले असता त्याची दखल घेत त्यांनी नोंद केली. आज अयान भारतातील राज्ये, राष्ट्रीय प्रतिके, सूर्यमाला, पचनसंस्था आदींबाबत सांगतो. अयान साऱख्या छोट्या मुलाची ग्रहण क्षमता बघून लोक चकित होतात.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला विशेष अधिकार दिलेत का? चित्रा वाघ यांचा सवाल

अयानने केलेले रेकॉर्ड-

  • भारताच्या नकाशातील २९ राज्ये सांगतो.

  • संपूर्ण सूर्यमाला व त्याची माहिती तोंडपाठ.

  • पचनसंस्थेचे अवयव सांगतो व ओळखतो

  • भारताची अनेक राष्ट्रीय प्रतीके त्याला अचूक माहिती आहेत, त्याबरोबरच भारताच्या राष्ट्रीय ध्वजाविषयी त्याला संपूर्ण माहिती आहे.

  • जगाच्या नकाशातील सात खंड आणि अनेक देश तो जगाच्या नकाशावर दाखवतो.

"मुलांचा वाचनावर भर असावा. त्यामुळे ते चांगली प्रगती करू शकतात. पालकांनी आपल्या व्यग्र जीवनातून थोडा वेळ काढून मुलांसाठी द्यायला हवा, तर ते चांगली प्रगती करू शकतील."

- अक्षया जाधव, अयानची आई

loading image
go to top