
Ayush Komkar Murder Case: Bandu Andekar Among 6 Arrested
Esakal
Ayush Komkar Murder Case: टोळीयुद्धातून हत्या झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीतील ६ जणांना अटक करण्यात आलीय. वर्षभरापूर्वी वनराज आंदेकर याची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला म्हणून वनराज हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची आयुषची हत्या केली गेली. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह ६ जणांना पोलिसांनी अटक केलीय. आयुष कोमकरवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.