
Ayush Komkar murder case linked to the Andekar gang
Esakal
पुण्यातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी, 5 सप्टेंबर रोजी, 19 वर्षीय आयुष गणेश कोमकर याची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमागील धक्कादायक सत्य समोर आलं आहे. ही हत्या गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने केली, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. या प्रकरणात 8 आरोपींना अटक करण्यात आली असून, टिपू पठाण टोळीचा देखील सहभाग असल्याचं उघड झालं आहे.