
पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात फरार असलेल्या आंदेकर टोळीतील आणखी चौघांना गुजरातमधून अटक करण्यात आली. गुन्हे शाखेने शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. या प्रकरणात यापूर्वी आठजणांना अटक केली असून, आरोपी कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०) हा अद्याप फरार आहे.