पुण्यातील दोन तरुणांची "एनडीए'मध्ये निवड 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये  आयुष पाटील आणि वेदांत आकेरकर यांची निवड झाली आहे."एनडीए'च्या144व्या तुकडीच्या अखिल भारतीय गुणवत्ता यादीत अनुक्रमे15व्या आणि331व्या क्रमांकावर त्यांची नावे झळकली आहेत. 

पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) चिंचवडच्या आयुष पाटील आणि धायरी येथील वेदांत आकेरकर यांची निवड झाली आहे. "एनडीए'च्या 144 व्या तुकडीच्या अखिल भारतीय गुणवत्ता यादीत अनुक्रमे 15 व्या आणि 331 व्या क्रमांकावर त्यांची नावे झळकली आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुषचे वडील रितेश पाटील हे हिंजवडीतील एका खासगी कंपनीत सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असून आई प्रणिता गृहिणी आहे. वेदांतचे वडील मांगिरीष आकेरकर हे बंगळूरमधील एमएनसीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत असून आई अंजली गृहिणी आहेत. 

आयुषला बारावीत 86.15 टक्के गुण मिळाले होते. तसेच, तीन वेळा एनडीएची लेखी परीक्षा दिली अन तीनही वेळा त्यात तो उत्तीर्ण झाला. परंतु, सर्व्हिस सिलेक्‍शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखतीत त्याला तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. एनडीएबरोबरच त्याची बारावीनंतर "टेक्‍निकल एन्ट्री'अंतर्गत सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीएमई) प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. परंतु, त्याने एनडीएमध्ये प्रवेश घेण्याचे ठरविले. त्याची "पॅरा रेजिमेंट'मध्ये सेवा करण्याची इच्छा आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वेदांतला बारावीत 84 टक्के मिळाले असून त्याने पहिल्याच प्रयत्नात लेखी परीक्षा आणि "एसएसबी'त यश मिळविले. त्याला पाणबुडीमध्ये काम करण्याची इच्छा असल्याने तो नौदलात प्रशिक्षण पूर्ण करून अधिकारी म्हणून रुजू होणार आहे. या दोघांनाही लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपेक्‍स करियर्समधून प्रशिक्षण घेतले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयुष आणि वेदांत ऑक्‍टोबरमध्ये "एनडीए'मध्ये रुजू होतील. तेथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आयुष देहरादूनच्या इंडियन मिलिटरी ऍकॅडमीमध्ये एक वर्ष सैनिकी प्रशिक्षण घेईल तर वेदांत केरळ येथील एझिमालातील इंडियन नेव्हल ऍकॅडमीत एक वर्षाचे प्रशिक्षण घेईल. या संस्थांमधील प्रशिक्षण यशस्वीपणे संपल्यावर हे दोघेही भारतीय सशस्त्र दलात अधिकारी म्हणून कार्यरत होतील. 
- लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राम्हणकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayush Patil and Vedanta Akerkar from Pune selected in NDA