

प्रयागराज, ता. १७ ः समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना अटक करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले होते का, असा सवाल करत याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला(ईडी) दिले. जोहार ट्रस्टशी संबंधित मनी लाँडरिंग गैरव्यवहार प्रकरणात खान यांना अटक करण्यात आली होती.
अटक करण्यापूर्वी खान यांना नोटीस बजावली होती का, हे स्पष्ट करण्याचा आदेशही न्या.राजीव गुप्ता व न्या. देवेंद्र सिंह यांच्या खंडपीठाने दिला. तपासादरम्यान खान सहकार्य करत नसल्याच्या ईडीने सादर केलेल्या व्हिडिओबाबतही न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले.दरम्यान, खान यांना अंतरिम दिलासा देण्यास मात्र नकार दिला. आझम खान यांच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी खान यांच्या अटकेच्या वैधतेला आव्हान देत राजकीय हेतूने त्यांना अटक केल्याचा दावा केला. खान यांची ३१ ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसहा वाजता सुटका झाल्यावर अवघ्या ४० मिनिटांनी त्यांना ईडीने अटक केली. यावेळी अटकेची पार्श्वभूमी खान यांना सांगितली नाही, हे घटनेच्या कलम २२(१)चे उल्लंघन असल्याचेही सिब्बल म्हणाले. या युक्तिवादाला विरोध करत ईडीचे वकील जोहेब हुसेन व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी पंचनामा, व्हिडिओ रेकॉर्डिंगसह पाच कागदपत्रे सादर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.