मुख्य अंकासाठी............... भोजने मॅटर्निटी होमला ठोकले सील

मुख्य अंकासाठी............... भोजने मॅटर्निटी होमला ठोकले सील
Published on: 

भोजने मॅटर्निटी होमला
महापालिकेने ठोकले सील
बालकाच्या विक्री प्रकरणात कारवाई
अमरावती, ता. २१ : नवजात बालकाची साडेतीन ते पाच लाखांमध्ये विक्री होत असल्याच्या आरोपानंतर डॉ. वैशाली भोजने यांच्या भोजने मॅटर्निटी व नर्सिंग होमला बुधवारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांच्या उपस्थितीत सील ठोकले.
फ्रेजरपुरा पोलिसांनी पीडित अल्पवयीन मातेच्या तक्रारीवरून अत्याचारासह मानवी तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्या दिवसापासून डॉ. वैशाली व पती प्रफुल्ल भोजने रुग्णालयाला कुलूप लावून पसार झाले. पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी महानगरपालिका प्रशासनाला एक पत्र देऊन रुग्णालयाला सील ठोकण्याची कारवाई करावी, असे म्हटले. त्यानंतर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या पाच डॉक्टरांची चमू बुटी प्लॉट येथील भोजने मॅटर्निटी व नर्सिंग होम परिसरात दाखल झाली. पोलिसांच्या उपस्थितीत कुलूप तोडण्यात आले. यानंतर फ्रेजरपुरा पोलिसांनी रुग्णालय आणि निवासस्थानाची झाडाझडती सुरू केली. जवळपास अडीच ते तीन तास पोलिस व महापालिकेच्या पथकाने डॉक्टर भोजने मॅटर्निटी व नर्सिंग होमची तपासणी केली. महिला डॉक्टरांच्या कक्षातून नोंदणीचे काही रेकॉर्ड तपास अधिकाऱ्यांनी जप्त केले. रेकॉर्ड जप्त केल्यानंतर मनपाने डॉक्टर भोजने मॅटर्निटी व नर्सिंग होमला सील ठोकले.
पीडितेला पाठविणारा डॉक्टर अटकेत
याप्रकरणात ज्या अल्पवयीन गर्भवती पीडितेवर प्राथमिक उपचार करून तिला डॉक्टर वैशाली भोजने यांच्याकडे पाठविणारा गगलानीनगर येथील शतायू क्लिनिक चालविणारा डॉ. मयूर उत्तमराव दांडगे (वय ३२, रा. अमरावती) यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलिस कोठडीत ठेवल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र राजूलवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com