

Gaurav Malak Appointed State Contact Head of Prahar Divyang Kranti Sanghatana
esakal
पुणे : प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी संघटनेच्या राज्यस्तरीय विस्तार आणि बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे सक्रिय कार्यकर्ते गौरव मालक यांची प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या राज्य संपर्कप्रमुख (अंध विभाग) पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.