esakal | ह्दय पिळवटून टाकणारी कहाणी : '...ते माहीत नाही, पण आमचे मात्र कुटुंब उद्‌ध्वस्त झाले' 
sakal

बोलून बातमी शोधा

pathari.jpg

या महामारीने अनेक कुटुंब उद्‌ध्वस्त झाली आहेत. यामुळे शहरातील अनेकांचे संसार डळमळीत झाले आहेत.

ह्दय पिळवटून टाकणारी कहाणी : '...ते माहीत नाही, पण आमचे मात्र कुटुंब उद्‌ध्वस्त झाले' 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : गोखलेनगरमध्ये एकटी राहणारी सविता तरडे... शुगर, बीपी, मणक्‍याचा त्रास अशा अनेक आजारांनी ग्रस्त... विद्यापीठ चौकात उकडलेली अंडी आणि आम्लेटची हातगाडी लावते. दररोजचा नफा दीडशे ते दोनशे. गेल्या दोन महिन्यांपासून गाडी बंद आहे. कमाई बंद आहे, पण खर्च सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात थोडाफार मिळाले. पण त्यातून काही भागत नाही.. डोक्‍यावर कर्ज झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सदाशिव पेठेतील संदीप यादव.. नऊ जणांचे कुटुंब.. संदीप साबुदाणा वड्याची गाडी लावतो, मोठा भाऊ रिक्षा चालवतो.. तर लहान भावाची सरबताची गाडी.. त्याच्या अपघात झाल्याने गेली वर्षभर त्यांची गाडी बंद आहे. त्यामुळे दीपक आणि मोठा भाई पप्पू या दोघांवर घराची जबाबदारी येऊन पडलेली. लहान भावाच्या दवाखान्याला नुकताच मोठा खर्च झाला. त्यातून सावरत नाही, तोच लॉकडाऊन. रिक्षा बंद आणि साबुदाण्याची गाडीही बंद .. मात्र औषधांचा आणि दररोजच्या खाण्यापिण्याचा खर्च सुरूच आहे.. दिवसरात्र कष्ट करून जी काही शिल्लक राहिली होती... तीही या दोन महिन्यांच्या कालावधीत संपून केली. ही आहेत शहरातील काही प्रातिनिधिक पथारी व्यावसायिकांची उदाहरणे.

पुण्यातील खव्वयांसाठी महत्वाची बातमी; आधी वाचा मग ऑर्डर करा

शहरात पथारी, हातगाडी व्यावसायिकांची संख्या ही जवळपास 48 हजार आहे. त्यापैकी केवळ महापालिकेकडे नोंद असलेल्या पथारी व्यावसायिकांची संख्याही केवळ 18 हजार 225 आहे. कधी महापालिकेच्या कारवाईत गाडी उचलली जाते. पोलिसांचे, माननीयांचे, मंडळांचे कार्यकर्त्यांना हप्ते चुकत नाहीत. फुकट येऊन खाऊन जाणारे वेगळेच. जेमतेम वीस ते बावीस दिवस धंदा झाल्यानंतर महिन्याला आठ ते दहा हजार रुपये हातात पडतात. त्यातही दुखणे आले, तर मग कोणाकडे तरी हात पसरायचा. लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक फटका बसला तो या घटकांना. लडखडत का होईना यांची सुरू असलेली जीवनाची गाडी, आज ठप्प होऊन पडली आहे. जवळील भांडवल तर संपले, वरून डोक्‍यावर कर्जही झाले, सांगा जगायचे कसे, असा सवाल आहे यादव आणि तरडे यांचा. 

सोशल डिस्टंसिंगचं उल्लंघन केल्यावर साफ करावं लागणा टॉयलेट

केंद्र सरकारने दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यातून धंदा सुरू करायचा की या काळात झालेले कर्ज फेडायचे. व्यवसाय सुरू केला, तर ग्राहक येणार का, पूर्वी प्रमाणे धंदा होणार का, याचे टेंशन त्यांच्या पुढे आहे. या महामारीने कोणाचे काय नुकसान केले हे माहीत नाही, पण आमचे कुटुंब उद्‌ध्वस्त मात्र केली. 

loading image
go to top