esakal | पुणेकर खवय्यांसाठी ही महत्त्वाची बातमी; आधी वाचा मग ऑर्डर करा
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus lockdown chitale shop online delivery system pune

पुणेकर त्याच्या या आवडीच्या पदार्थ्यांना मिस करत आहेत. हे पदार्थ त्यांना घरपोच मिळण्याची व्यवस्था हळू हळू आकाराला येत आहे.

पुणेकर खवय्यांसाठी ही महत्त्वाची बातमी; आधी वाचा मग ऑर्डर करा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे Coronavirus : पुणे म्हटले की बाकरवडी आणि बाकरवडी म्हटलं की चितळे! हे समीकरण वर्षानुवर्षे पक्के झाले आहे. लॉकडाउनमुळे घरात बसलेल्या खवय्या पुणेकरांना चितळेच्या बाकरवडीपासून श्रीखंडापर्यंत सर्वच पदार्थांची आठवण येत असणार. त्यांची गरज ओळखून लॉकडाउनमध्ये नियमांच पालन करत चितळे बंधूंनी ऑनलाइन घरपोच सेवा द्यायला सुरवात केली आहे. त्यासाठी नेहमीच्या संकेतस्थळावर ग्राहकांनी मागणी नोंदवायची आहे.

आणखी वाचा - धक्कादायक लॉकडाउनमध्ये पुण्यात हुक्क्याची होम डिलिवरी

पुण्यात सध्या अनेक दुकानं, नियमाचं पालन करून, सुरू होत आहेत. सध्या या दुकानांमधून आपल्याला हवे ते पदार्थ ऑर्डरही करता येत आहेत. पुण्यातले नागरिक म्हणजे अस्सल खवय्ये. त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ म्हणजे, जणू जीव की प्राणच. अनेकदा आवडीच्या पदार्थांसाठी लांबचा फेरा मारावा लागला तरी, पुणेकर तयार असतात. सध्या लॉकडाउनमुळं पुणेकर त्याच्या या आवडीच्या पदार्थ्यांना मिस करत आहेत. हे पदार्थ त्यांना घरपोच मिळण्याची व्यवस्था हळू हळू आकाराला येत आहे. चितळे उद्योग समूहाने पुणेकरांची आवड लक्षात घेऊन, लॉकडाउनचे नियम पाळत ग्राहकांची सोय करण्याचे नियोजन केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी वाचा - खडकीमध्ये आता मायक्रो झोनची निर्मिती; वाचा सविस्तर बातमी

ऑनलाइन सेवेबद्दल सांगताना इंद्रनील चितळे म्हणाले,""ग्राहकांची गरज लक्षात घेऊन लॉकडाउनच्या नियमांत आम्ही घरपोच सेवा सुरू केली आहे. त्यासाठी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील 18 पिनकोड कार्यान्वित करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये मात्र आमची सेवा बंद आहे.'' जास्तकाळ टिकणारे आणि मॅकेनाईज्ड पद्धतीने बनवता येणाऱ्या पदार्थांची निर्मिती आम्ही सध्या करत आहोत. तसेच कमीतकमी मानवी संपर्क येण्यासाठी आवश्‍यक सर्व खबरदारी आम्ही घेत असल्याचे चितळे यांनी सांगितले. एखाद्या सोसायटीने मिळून ऑर्डर दिल्यास त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. बाकरवडी आणि श्रीखंडाला विशेष मागनी असल्याचेही चितळे यांनी सांगितले.
 

loading image
go to top