Pune News : बागेश्वर बाबांचे 'अंनिस'ला खुले आव्हान दरबारात येऊन दूध का दूध पाणी करा

आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करू, एकदाच आमने-सामने होऊन जाऊ द्या" असे थेट आव्हान
bageshwar baba open challenge to annis  demand to make hindu rashtra
bageshwar baba open challenge to annis demand to make hindu rashtraesakal
Updated on

पुणे : आचार्य धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर ,धाम सरकार (बागेश्वर बाबा) यांच्या पुण्यात होणाऱ्या सत्संग आणि दिव्यदरवार कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) विरोध केला होता. त्यावर आज बागेश्वर बाबा यांनी समितीला खुले आव्हान दिले असून "माझ्या दरबारामध्ये या, तुमचे काय म्हणणे आहे ते मांडा.

आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करू, एकदाच आमने-सामने होऊन जाऊ द्या" असे थेट आव्हान दिले आहे. तसेच "भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठी संविधानामध्ये बदल केला पाहिजे" अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.

बागेश्वर बाबा यांचा आजपासून पुण्यात संगमवाडी येथे तीन दिवसीय सत्संग होत आहे. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बागेश्वर बाबा त्यांच्या सत्संगामध्ये चमत्कार करतात, आजार बरा करतात, रावणाशी फोनवर संपर्क साधतात तसेच संतांबद्दल आक्षेपारी वक्तव्य करतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आणि अंनिसने होती. त्यासंदर्भात आज बागेश्वर बाबा यांनी भूमिका स्पष्ट केली.

बागेश्वर बाबा म्हणाले, "सत्संगामध्ये बोलत असताना एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. त्याप्रमाणे कोण कोणता शब्द घेतो त्यावरून त्याची भूमिका ठरते. मी कधीही रावणाशी फोनवर बोललेलो नाही. पण कथा सांगताना उदाहरण म्हणून दृष्टांत दिला जातो.

त्या अर्थाने मी बोललेलो आहे. तसेच आजार बरे करण्यासाठी रुग्णालयात गेलेच पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनचे काही आक्षेप असतील तर त्यांनी माझ्या दरबारात यावे, त्यांना कोणीही अडवणार नाही, आपलं एकदा आमने-सामने होऊन जाऊ द्या."

bageshwar baba open challenge to annis  demand to make hindu rashtra
Pune : सरकार विरोधात नाही,मराठा आरक्षणासाठी नवी संधी, शंभुराज देसाई यांचा दावा

हिंदु राष्ट्राच्या भूमिकेबद्दल ते म्हणाले,"भारताच्या संविधानामध्ये आत्तापर्यंत वेळा संशोधन करण्यात आलेले आहे. तर आणखी एकदा त्यात संशोधन करून भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केले पाहिजे. हिंदूराष्ट्र म्हणजे राम राज्य आहे. त्यामध्ये समानता, सुशासन, कतृत्वावर भर असेल. हिंदूराष्ट्र झाल्यानंतर मुस्लीम, ख्रिश्चन यांना देश सोडून कुठे जावे लागणार नाही. परंतु जे देशाच्या विरोधात भूमिका घेतील त्यांना धडा शिकवला जाईल.

तुकारामांच्या वक्तव्याबद्दल मागितली माफी

रायपूर येथील सत्संगामध्ये वाघेश्वर बाबा यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, "महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत तुकाराम माझ्यासाठी हे वंदनीय आहेत. त्याबाबत मी कोणतीही वादग्रस्त वक्तव्य केले नव्हते. प्रवचनात माझ्या बुंदेलखंडी भाषेमध्ये कथा सांगत असताना उदाहरण जिले होते. यामध्ये कोणाच्याही असलेला ठेच पोहोचविण्याचा माझा उद्देश नव्हता.

संत तुकाराम यांचे हिंदू धर्म आणि सामाजिक जडणघंडीत महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. मला कोणाचेही मन दुखवायचे नव्हते, तरीही मी पुन्हा एकदा त्या प्रसंगाबद्दल माफी मागतो. तसेच वेळ मिळाला तर देहू मध्ये जाऊन दर्शन देखील घेईल असे त्यांनी सांगितले.तसेच योग्य ती कार्यवाही करावी असे बागेश्वर बाबा म्हणाले‌.

गरिबी हटवण्यासाठी काम करणे आवश्यक

देशातील गरिबी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गरिबी हटविण्यासाठी तळागाळात जाऊन योजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. पण आपल्याकडे वरवर काम आहे. त्यामुळे योग्य गरिबी वाढत आहे, अशा शब्दात बागवेश्वर यांनी राज्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर कान टोचले.

bageshwar baba open challenge to annis  demand to make hindu rashtra
Pune : प्रतिकूल परिस्थितीत करा पिकांचे संरक्षण,नुकसानीनंतर ७२ तासांमध्ये विमा कंपनीला कळवणे आवश्यक

जनतेला बाबा माना

बागेश्वर बाबा यांचे सत्संग आयोजित करण्यासाठी राजकारण्यांमध्ये चडाओढ सुरू आहे. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले,"सर्वच राजकीय पक्षाचे राजकीय नेते मला सत्संगासाठी बोलवतात. पण मला बाबा म्हणण्यापेक्षा, जो जनतेला बाबा समजून त्यांची काम करेल तोच राजकारणामध्ये यशस्वी होणार आहे. माझ्याकडे अनेक राजकारणी येतात, अनेक जण वैयक्तिक कामे घेऊन माझ्याकडे येतात. तर राष्ट्रहिताचे मुद्दे घेऊन आलेले फक्त एकदोघेच असतात असे त्यांनी सांगितले.‌

मुळीक यांना फळ मिळणार का?

पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी जगदीश मुळीक हे इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी बागेश्वर बाबा यांचा तीन दिवसांचा सत्संग पुण्याच्या आयोजित केलेला आहे.‌ ते खासदार होणार का असा प्रश्न विचारले असता बागेश्वर बाबा यांनी "ते जे प्रार्थना करतील,‌तीच प्रार्थना माझी असेल, त्यांना यश येईल" अशा शब्दात त्यांनी हा मुद्दा टोलवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com