Baglan Farmers: अवकाळीचा फटका, दुष्काळाच्या झळा; बागलाणमधील दोन हजार शेतकऱ्यांची नुकसानभरपाई ई-केवायसीत अडकली

Mahaonline Portal Issues Delay Relief for Baglan Farmers: २४ तासांत ई-केवायसीचा प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलन; बागलाणमधील शेतकऱ्यांचा इशारा
Baglan Farmers Struggle to Get Unseasonal Rain Compensation Due to Mahaonline Portal Failure and Aadhaar Bank Seeding Issues

Baglan Farmers Struggle to Get Unseasonal Rain Compensation Due to Mahaonline Portal Failure and Aadhaar Bank Seeding Issues

esakal

Updated on: 

-रोशन खैरनार

सटाणा : एका बाजूला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिरवळीची स्वप्ने उद्ध्वस्त केली, तर दुसऱ्या बाजूला दुष्काळाने शेतीपुढील संकट अधिक गडद केले. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर झालेल्या नुकसानभरपाईसाठीही तांत्रिक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मार्च-एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या जवळपास दोन हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया महाऑनलाइन पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे रखडली आहे. तर, ई-केवायसी पूर्ण केलेल्या एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे बँक खात्याशी सीडिंग नसल्याने मदतीची रक्कम जमा होण्यात अडचणी येत आहेत. तालुका दुष्काळी जाहीर झालेला असताना आणि दिवाळी तोंडावर आलेली असताना मदतीची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com