दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरला जामीन मंजूर

दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरला जामीन मंजूर

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी वकील संजीव पुनाळेकर अटकेत होता. आता त्याला विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

संजीव पुनाळेकर याच्या जामिन अर्जावर विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या यांच्या न्यायालयाकडून निकाल दिला गेला. पुनाळेकरला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. यामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयात सोमवार व गुरूवारी हजर राहणे, परवानगीशिवाय परदेशात जावू नये, साक्षीदारावर दबाव आणू नये, सीबीआयने बोलावल्यास हजर राहणे, यांसारख्या अटींवर त्याला जामिन मंजूर करण्यात आला. वकील पी. पी. सूर्यवंशी व आरोपीतर्फे इचलकरंजीकर हजर होते.

दरम्यान, आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी वकील संजीव पुनाळेकर याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीकरिता त्याला पुन्हा कोठडी देण्याची मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) न्यायालयाकडे करण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com