पुणे - देवस्थानची जमीन विकसित करण्याच्या नावाखाली आणि कृषी उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवत गुंतवणूकदारांसह सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी वकिलाचा जामीन अर्ज पुण्याच्या विशेष न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला.