भोंदूबाबा वैद्यचा जामीन फेटाळला

भोंदूबाबा वैद्यचा जामीन फेटाळला
Published on

पुणे, ता. १८ : दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करत लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबाचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी फेटाळला. या प्रकरणातील गांभीर्य, तथ्य व परिस्थिती लक्षात घेता जामीन फेटाळल्याचे आदेशात नमूद आहे.
हृषीकेश श्रीकांत वैद्य (वय ३९, रा. वसई) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. ही घटना डिसेंबर २०२३ ते ११ मे २०२५ दरम्यान घडली. याबाबत २७ मार्च २०२६ मध्ये हडपसर पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार पोलिसांनी २८ मार्चला त्याला अटक केली. सुरुवातीला पोलिस कोठडी, त्यानंतर तो आता न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीत असताना वैद्य याने जामिनासाठी अर्ज केला. त्यास सरकारी वकील ॲड. लीना पाठक, फिर्यादीचे वकील ॲड. रोहन नहार यांनी विरोध केला. ॲड. नहार यांना ॲड. ओंकार फडतरे, ॲड. गायत्री पोटवडे आणि ॲड. चैतन्य अभंग यांनी सहकार्य केले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. वैद्य याने धार्मिक गुरू म्हणून असलेल्या विश्‍वासाचा गैरफायदा घेत पीडितेवर अत्याचार केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी केली.
नाशिकमधील कॅप्टन अशोक खरातचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच शहरातील हा प्रकार उघडकीस आला होता. महिलेशी समाजमाध्यमांतून ओळख झाल्यानंतर मी देवाचा भक्त असून, तुला उपासना कशी करायची हे शिकवितो, असे सांगून महिलेला जाळ्यात खेचले. तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Court rejects anticipatory bail plea of cyber fraudster in Rs 35 lakh 'Digital Arrest' scam
Yavatmal fake marriage case
Jalgaon woman assaulted under false promise of marriage
Beed sexual assault news update
Marathi News Esakal
www.esakal.com