जादा नफ्याचे आमिष नडले; तरुणीला...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 March 2020

- तेल खरेदी व्यावसायात जादा नफ्याचे आमिष दाखवून तरुणीची 11 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक 

पुणे : जादा नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणीची तब्बल 11 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक झाली. आरोपीने या तरुणीला प्राण्यांसाठी बनविण्यात येणाऱ्या औषधांसाठी लागणाऱ्या तेलाच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले होते. याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हडपसरमधील शेवाळवाडी येथे राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी या नोकरदार आहेत. फिर्यादी यांच्या मोबाईलवर 17 जुलै 2019 मध्ये अनोळखी व्यक्तींनी संपर्क केला. इंग्लंडमधील एका फार्मासिस्ट कंपनीला प्राण्यांसाठी लागणारी औषधे बनविण्यासाठी विशिष्ट तेलाची आवश्‍यकता असते. हे तेल भारतामध्ये मुबलक प्रमाणात व स्वस्तामध्ये उपलब्ध आहे. मात्र, याच तेलाला अमेरिकेमध्ये अडीच हजार अमेरिकन डॉलर इतकी किंमत मिळते.

संबंधित तेल आपण खरेदी करून आमच्या कंपनीमार्फत ते अमेरिकेमध्ये विक्री करता येऊ शकते. त्यासाठी 5 हजार अमेरिकन डॉलर मिळू शकतात. या व्यवसायातून फिर्यादी जादा नफा मिळेल, त्या नफ्यातील 60 टक्के रक्कम फिर्यादी यांना तर 40 टक्के आम्हाला मिळेल, अशा स्वरुपाचे आमिष फिर्यादी यांना दाखविले. त्यानंतर हे तेल खरेदी करण्यास भाग पाडून फिर्यादी यांना वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगून आरोपींनी फिर्यादीस विविध बॅंक खात्यात 11 लाख 76 हजार रुपये भरण्यास सांगून त्यांची फसवणूक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bait of Extra Money Fraud of Rs 11 Lakhs and 76 thousand