

पुणे : धावण्यासाठी पोषक असलेला थंडीचा पारा त्यामुळे बजाज अलियान्झ मॅरेथॉनचा वाहिला अखंड झरा! पाचव्या वर्षाच्या मोसमातही असलेले उत्साहाचे चैतन्य... सकाळ मॅरेथॉनचा हा अविरत झरा रविवारी खळखळून वाहणारा ठरला. अरुण राठोड आणि अर्चना जाधव या एलिट धावपटूंनी पुणे जिंकले; पण धावणाऱ्या हजारो हौशी धावपटूंच्या चेहऱ्यावरही तोच उत्साह आणि तोच आनंद ‘सकाळ’च्या या मॅरेथॉनचे माहात्म्य पुन्हा एकदा सिद्ध करणारा ठरला.