Video : ज्येष्ठांसह चिमुकल्यांनीही लुटला मॅरेथॉनचा आनंद; थंडीतही तुफान गर्दी

The bajaj allianz pune half marathon was enjoyed by kids and Old age people
The bajaj allianz pune half marathon was enjoyed by kids and Old age people
Updated on

पुणे : कडाक्याची थंडी, पहाटेची वेळ असूनही फक्त आणि फक्त आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी सक्रियतेचा संकल्प कृतीत उतरविण्याची प्रेरणा देत अबाल वृद्धांसह तरुण-तरूणी आणि चिमुकल्यांनाही आज (रविवार) बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये धावण्याचा मोह आवरला नाही. धावण्यासोबत या सर्वांनी आपली रविवारची सकाळ नृत्य करतही प्रसन्न केली. 

म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पहाटे सव्वापाच वाजता नामवंत धावपटूंचा सहभाग असलेल्या 21 किलोमीटर अंतराच्या हाफ मॅरेथॉनला निशाण दाखविण्यात आले. वेगवान मार्ग आणि पहाटेचे थंड वातावरण स्पर्धकांना वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविण्यासाठी उपयुक्त होते. यामध्ये दार्जिलिंगच्या तीर्थ पुन याने विजेतेपद मिळविले. वीस हजार धावपटूंनी मॅरथॉनमध्ये सहभान नोंदविला. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गाच्या दुतर्फा परिसरातील नागरिकांसह विविध संस्थांनी तयारी केली होती. 

21 किमीच्या मुख्य शर्यतीसह पाच आणि दहा किलोमीटर या इतर दोन शर्यतीही घेण्यात आल्या. या स्पर्धेची 'ब्रॅंड अँबेसिडर' जॅनेट चेरोबोन-बॉक्कम हिने विविध ठिकाणी धावपटूंशी संवाद साधला असून एक्‍स्पोमध्येही सादरीकरण केले. ओघवत्या शैलीमुळे तिचे बोल प्रेरक ठरत असून तिच्यासह सेल्फी घेण्यासाठी गर्दी उसळली होती. मुख्य स्टेडियममध्ये झुंबा डान्स, स्टंट आदींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणांसह ज्येष्ठांनीही झिंग झिंग झिंगाट गाण्यावर ठेका धरला. तर, सेल्फी पॉइंटला स्पर्धकांनी लाईन करून फोटो काढले.

'पोलिस कमिशनर कप' आणि 'कॉर्पोरेट कप' हे दोन गट स्पर्धेची वैशिष्ट्ये होती. पोलिस दलातील पुरुष-महिलांची संख्या चारशेच्या घरात होती, तर 28 कंपन्यांच्या संघांनी भाग घेत कॉर्पोरेट कपला लक्षवेधी प्रतिसाद दिला. सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांनी 10 किमी शर्यत पूर्ण केली.

स्पर्धेच्या मार्गावर नऊ ठिकाणी संयोजकांनी "चिअरिंग स्टेशन्स'ची निर्मिती केली होती. तेथे आउटडोअर एक्‍स्पर्ट, न्युट्रीशनिस्ट आणि फिटनेस ट्रेनर्स उपस्थित असतील. त्यामुळे मॅरेथॉन पाहण्याशिवाय प्रेक्षकांना आणखी खूप "कमाई' होईल. शरीराची लवचिकता, दमसास आजमाविण्याशिवाय त्यांना फिटनेस टेस्टही देता येईल. त्यांना पूरक आहाराविषयी शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com