Pune Grand Tour 2026 cycle competition
sakal
Traffic changes announced for Bajaj Pune Grand Tour Stage 2 on 21 January : ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ सायकल स्पर्धेला आज सोमवार(१९जानेवारी)पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे शहरातील आठ किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर ही स्पर्धा पार पडली. प्रोलॉगच्या आधारे पुढील चार दिवस होत असलेल्या स्पर्धेमधील खेळाडूंची क्रमवारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे १६४ स्पर्धकांना त्यांचे स्पर्धेच्या सुरुवातीचे स्थान निश्चित करण्यासाठी प्रोलॉग स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे.
तर बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2 मार्गावरील वाहतूक २१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सांयकाळी सहा वाजेदरम्यान आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार आहे. वाहतूक खालील प्रमाणे पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
बजाज पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेतील सायकलिस्ट दुसऱ्या टप्प्यात बुधवारी (२१जानेवारी) राजगड व भोर तालुक्यातील विविध मार्गावरून जाणार आहेत. स्पर्धा शांततेत व सुरळीत पार पाडावी तसेच कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून वाहतूक बदल करण्यात आले असून काही मार्ग तात्पुरते बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
शिवाय, या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान 21 जानेवारी रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत राजगड व भोर तालुक्यात वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. या मार्गावरील वाहन चालकांनी स्पर्धेच्या दिवशी पाबेघाट मार्ग तसेच पानशेत कुरण बुद्रुक कादवे खिंड या पर्यायी मार्गाचा वापर करून पुण्याकडे येणे जाण्यासाठी वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे स्पर्धा संपल्यानंतर सर्व वाहतूक मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.