
पुणे: भगवे झेंडे, ढोल ताशांचा गजर, गगनभेदी गर्जना, पाऊस अशा वातावरणात इतिहासाच्या पाऊलखुणा वर्तमानाला साद घालत होत्या. पेशव्यांच्या देदीप्यमान व गौरवशाली इतिहासाचे स्मरण करताच पुन्हा एकदा शनिवार वाडा थोरल्या बाजीराव पेशव्यांची विजयगाथा सांगू लागला. निमित्त होते थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२५व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे.