पेशव्यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात अवमान, मस्तानीच्या वंशजांचा कार्यक्रमावर बहिष्कार

bajirao peshwa statue controversy : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. पण कार्यक्रमावर मस्तानीचे वंशज नवाब शदाब अली बहादूर पेशवा, नवाब ऑफ बांदा यांनी बहिष्कार टाकला आहे.
Bajirao Peshwa descendant boycotts NDA statue unveiling
Bajirao Peshwa descendant boycotts NDA statue unveilingEsakal
Updated on

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. पण या सोहळ्याला मस्तानीचे वंशज नवाब शदाब अली बहादूर पेशवा, नवाब ऑफ बांदा यांनी बहिष्कार टाकला आहे. आयोजकांनी उशिरा आमंत्रण दिल्याचा आणि व्यासपीठावर जागा नाकारल्याचा आरोप त्यांनी केलाय. यामुळे पेशव्यांच्या वंशजांचा अवमान झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत एक पत्रकही नवाब ऑफ बांदा यांच्याकडून जारी करण्यात आलंय. आता यामुळे एनडीएतील पेशव्यांच्या पुतळा अनावरणाच्या सोहळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com