
Pune NGO’s 47 Years of Service
esakal
पुणे : दिव्यांग मुलांसाठी केवळ शैक्षणिक किंवा आरोग्याच्या सुविधा नाहीत, तर त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि दिव्यांगांचे आत्मबळ वाढवण्यासाठी १९७८ मध्ये निर्मिती झाली, ‘बालकल्याण’ या संस्थेची. तेव्हापासून गेली ४७ वर्षे दिव्यांगांच्या कल्याणाचा हा वसा अविरतपणे जपत देशभरातील संस्थांना पथदर्शी ठरणारे काम संस्था करत आहे. समाजातील सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या आणि यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या संस्थेचे हे आदर्श उदाहरण आहे.