बाळासाहेब ठाकरेंच्या बहिणीचे पुण्यात निधन, संजीवनी करंदीकरांची प्राणज्योत मालवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजीवनी करंदीकर

बाळासाहेब ठाकरेंच्या बहिणीचे पुण्यात निधन, संजीवनी करंदीकरांची प्राणज्योत मालवली

पुणे : थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी श्रीमती संजीवनी करंदीकर यांचं आज पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने खासगी रुग्णालयात त्यांचं दुःखद निधन झालं.

(Balasaheb Thackeray's sister dies in Pune)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या त्या आत्या होत्या व किर्तीताई फाटक यांच्या मातोश्री होत्या. आज सकाळी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे मुलगी किर्ती फाटक, स्वाती सोमन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

संजीवनी करंदीकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काल दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजता वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हेही वाचा: 'ओवैसीला माहितीये महाराष्ट्रात नामर्दाचं सरकार'; नितेश राणेंचा ओवैसीवरून निशाणा

संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांच्या आयुष्यातील बरीच वर्षे पुण्यात गेली. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये ३८ वर्षे मशीन सेक्शन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या नेत्यांसह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

''स्वाभिमानाने जीवन कसं जगावं, याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आई होती, तिने एक डायरी केली होती, ज्यात तिने अत्यसंस्काराची देखील तजवीज करुन ठेवली होती, आम्हाला कसलाही त्रास होऊ नये याची तिनं काळजी घेतली होती. तिचं आयुष्यंच प्रेरणादायी होतं, अशा भावना संजीवनी करंदीकर यांची मुलगी आणि शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस किर्ती पाठक यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: अधिकाऱ्यांची हकालपट्टी, नोकरभरती थांबवली; Twitterचा मोठा निर्णय

"त्यांचा आणि माझा अनेक वर्षे परिचय होता. त्यांच्या घरी अनेकवेळी मी जायचे, त्यांनी दीर्घकाळ शिवसेनेचा प्रवास जवळून पाहिला. गेले काही दिवस त्यांना तब्येतीवरून त्रास होत होता तरी इच्छाशक्तीवरून त्या कुटुंबाला जोडल्या गेल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे शिवसेना परिवाराची मोठी हानी झाली आहे."

- निलम गोऱ्हे (विधानपरिषदेच्या उपसभापती )

Web Title: Balasaheb Thackeray Sister Sanjeevani Karandikar Death Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top