Balbharti : ‘बालभारती’ विकणे जाहिरातीने उडाली खळबळ! शिक्षण विभागात धावाधाव

बालभारतीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू
Balbharti
Balbharti Sakal

पुणे - राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत असणारे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे म्हणजेच बालभारतीचे डोमेन विकणे आहे, अशा स्वरूपाची जाहिरात गुगलवर झळकली आणि अवघ्या काही वेळात शिक्षण विभाग अक्षरश: हादरले. बालभारतीने तातडीने ‘हे नेमकं झालं कसे’ हे शोधण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज कामाला लावली.

बालभारतीने यासंदर्भात तक्रार नोंदवली असल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. तसेच याबाबत तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर नेमके काय झाले आहे, हे उघड होईल, असेही बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Balbharti
Mumbai Rain : मुंबईत जोरदार पाऊस; रस्ते वाहतूक मंदावली

पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई, अभ्यासक्रम संशोधन करणाऱ्या ‘बालभारती’ या राज्य सरकारच्या संस्थेच्या ‘balbharati.in’ या संकेतस्थळाचे डोमेन दोन हजार युएस डॉलर किमतीला विकणे आहे, अशी जाहिरात गुगलवर प्रसिद्ध झाल्याचे दिसून आले.

तर ‘ebalbharti.in’ या संकेतस्थळावर बालभारतीची पाठ्यपुस्तके ‘ई साहित्य’ स्वरूपात उपलब्ध आहेत. राज्यातील कोट्यवधी विद्यार्थी, लाखो पालक, शिक्षक या संकेतस्थळाला भेट देतात, तसेच या संकेतस्थळावरून पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात विनामूल्य डाऊनलोड करता येतात.

Balbharti
Mumbai Crime : खून करून फरार झालेल्या कैद्याला तीन महिन्यांच्या निरंतर पाठलागानंतर अटक

तांत्रिक अहवाल मागविला असून कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू - बालभारती

बालभारतीचे ‘balbharati.in’ हे अधिकृत डोमेन असून ते २००५-०६ या वर्षात घेण्यात आले आहे. तर या डोमेनच्या नूतनीकरणाची पुढील पाच वर्षांची प्रक्रिया २०२३मध्ये केली आहे. असे असतानाही कोणीतरी डोमेनबाबत खोडसाळपणा केल्याचे दिसून येत आहे.

Balbharti
Mumbai Crime : खून करून फरार झालेल्या कैद्याला तीन महिन्यांच्या निरंतर पाठलागानंतर अटक

याबाबतचा तांत्रिक अहवाल घेतला असून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सुरवातीला ऑनलाइन स्वरूपात तक्रार नोंदविण्यात येत आहे. नेमका काय प्रकार झाला आहे, याची माहिती संकलित करण्याची कार्यवाही सध्या सुरू असून माहिती घेतली जात आहे. रीतसर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करण्यात येणार आहे,’’

- कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती

‘‘इंटरनेटवर ‘बालभारती’चे अधिकृत डोमेन विकण्याची जाहिरात सध्या दिसत असून हा फसवणुकीचा प्रकार आहे. याबाबत बालभारतीकडून कार्यवाही करण्यात येत आहे. लवकरच कायदेशीर तक्रार दाखल करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे.’’

- सूरज मांढरे, राज्य शिक्षण आयुक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com