
बालेवाडी : दुपारी एटीएम मधून पैसे काढून आणायला घराबाहेर पडलेले श्री. गोपाळ वाघ (वय ६२) हे घरी रात्री उशिरापर्यंत परतलेच नाहीत म्हणून त्यांचा मुलगा अमित आणि सून पूजा यांनी तात्काळ शोधाशोध सुरू केली, पण काही पत्ता लागेना. त्यामुळे व्हाट्सऍपवर "श्री. वाघ हरवले असल्याचा" संदेश प्रसारित केला. कोणाला काही माहित असेल तर तात्काळ संपर्क साधा," असे आवाहन करण्यात आले होते. हे मेसेज विविध स्तरांत पोहोचला, पण नियतीने काहीतरी वेगळेच ठरवले होते...