

Chamber Collapse Creates Major Road Hazard in Balewadi
Sakal
बालेवाडी : उमरजी हॉस्पिटलजवळील बालेवाडी रस्त्यावर सांडपाणी वाहिनीचा चेंबर गेल्या आठवडाभरापासून खचला असून हा चेंबरबरोबर रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे अपघाताचा धोका आहे. त्यामुळे हा चेंबर त्वरित दुरुस्त मागणी या भागातील नागरिक करत आहेत. या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते. तसेच येथे वाहतूक कोंडीही नित्याची असते. त्यातच खचलेला चेंबर रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो व वाहतूक कोंडीत अजून भर पडते. रात्रीच्या वेळी चेंबरचा अंदाज न आल्यास याठिकाणी अपघाताचा धोकाही संभवतो.